Monday, 20 November 2017

आयुष्याचा शिल्पकार



     आयुष्याचा शिल्पकार

तुच खरा शिल्पकार आयुष्य घडविणारा
रात्रीच्या गर्भात जागून प्रेमवर्षाव करणारा  ||1||

तुझ्या हळव्या मनातून पाझरे ममतेचा झरा
शब्दांची कठोरताही पण कुटुंबात आधार खरा  ||2||

तुझ्या अंगातील घामाचा सुगंध सर्वत्र वाहतो
न थकणारे शरीरही उज्ज्वल भविष्य पाहतो  ||3||

आली संकटे कितीही खंबीरपणे असतो उभा
तुझ्या फाटलेल्या कपड्यातच घरात दिसते शोभा  ||4||

तुझ्या कठोरते मध्येच खरा संदेश दडला आहे
मुलांच्या भावी सुखातच सारा जीव गुंतला आहे  ||5||

न थकणारे भाव सारे चेहऱ्यावरती भासते
सुरकुत्यातील अक्षरातच भूतकाळ मी वाचतो  ||6||

तूच समई,फुलवातही खरा प्रेमाचा सागर
तूच माझा पोशिंदा अन् भविष्याचा गजर  ||7||

सारे आयुष्य झिजविणारा तूच माझा शिल्पकार
हाच तो बाप माझा पडद्यामागील कलाकार  ||8||

कवी-अरूण झगडकर
गोंडपिपरी जि.चंद्रपूर